रोहा ते कोल्हापूर कोस्टल रेल्वेमार्ग - गिते

 रायगड जिल्ह्याला रेल्वेमार्गे कोल्हापूरला जोडण्याच्या कोस्टल रेल्वे प्रकल्पाचं आश्वासन केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी दिले आहे. 

Updated: Jul 8, 2014, 08:51 AM IST
रोहा ते कोल्हापूर कोस्टल रेल्वेमार्ग - गिते title=

नवी दिल्ली :  रायगड जिल्ह्याला रेल्वेमार्गे कोल्हापूरला जोडण्याच्या कोस्टल रेल्वे प्रकल्पाचं आश्वासन केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी दिले आहे. 

रोहा ते कोल्हापूर असा हा कोस्टल रेल्वेमार्ग असेल अशी माहिती अनंत गिते यांनी दिलीय. या संदर्भातला प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना देणार असल्याची माहिती गिते यांनी दिली. 

रोहा इथून सुरू होणारा हा रेल्वेमार्ग श्रीवर्धन, हरीहरेश्वरमार्गे, रत्नागिरी आणि तिथून कोल्हापूरला जोडण्याचा प्रस्ताव आहे. पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी थेट जोडण्याच्या या प्रकल्पामुळे मच्छिमारांना मोठा फायदा होणार असल्याचं गिते म्हणाले. 

कोकणात मोठ्या प्रमाणात नोक-यांची संधी उपलब्ध करण्यासाठी दोन मोठे उद्योग कोकणात आणणार असल्याचंही गिते म्हणाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.