राज्यात कडाक्याची थंडी, महाबळेश्वरमध्ये पारा शून्यावर

राज्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय. राज्याचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये तर पारा शुन्यावर गेलाय. त्यामुळं आजच्या या थंडीचा पर्यटकही आनंद लुटताना दिसताय. 

Updated: Jan 8, 2017, 10:04 AM IST
राज्यात कडाक्याची थंडी, महाबळेश्वरमध्ये पारा शून्यावर title=

महाबळेश्वर : राज्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय. राज्याचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये तर पारा शुन्यावर गेलाय. त्यामुळं आजच्या या थंडीचा पर्यटकही आनंद लुटताना दिसताय. 

वेण्णा लेक आणि लिंगमाळमध्ये दवबिंदु गोठून हिमकण तयार झालेयत. या भागात तापमान उणे 1.6 अंशावर आलंय. वेण्णा तलाव परिसरात तर हिमकणांची पांढरीशुभ्र दुलई पसरलेली दिसत होती. 

सकाळच्या वेळी फिरायला आलेल्या पर्यटकांनी या हिमकणांचा आनंद लुटला. या वर्षीच्या हंगामात 10 डिसेंबरला हिमकण पसरले होते, त्यानंतर आज महिनाभराने पुन्हा हिमकण दिसतायत. तर इकडे निफाडमध्ये पारा 6.8 अंशांवर गेलाय. तर जालन्यात पारा 13 तर विदर्भात गोंदिया आणि भंडा-यात पारा 17 अंशांवर आहे.