पंकजा मुंडेचा दसरा मेळावा आला पण गड गेला...

 भगवानगडावर दसरा मेळाव्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्यानंतर हा दसरा मेळावा भगवानगडाखाली असलेल्या भारजवाडी येथे होणार आहे. 

Updated: Oct 10, 2016, 09:48 PM IST
पंकजा मुंडेचा दसरा मेळावा आला पण गड गेला...  title=

बीड :  भगवानगडावर दसरा मेळाव्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्यानंतर हा दसरा मेळावा भगवानगडाखाली असलेल्या भारजवाडी येथे होणार आहे. 

या संदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षक सौरभ तिवारी यांनी ही माहिती दिली. पण यामुळे दसरा मेळावा आला पण गड गेला अशीच प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटते आहे. 

पंकजा मुंडे यांच्या भगवानगडावरील दसरा मेळाव्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली होती. पण हा पंकजा मुंडे यांनी आपली राजकीय शक्ती पणाला लावून दबाव टाकला आणि सभा होणार नक्की होणार हे दाखवून दिले, पण कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यामुळे जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली पण गडाखाली सभा करण्यास सांगितले आहे.