पुण्यात सन्मानपूर्वक आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न - अजित पवार

 पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीची बोलणी सुरु असून आज निर्णय व्हावा अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. आघाडी व्हावी अशी आपली इच्छा असून ती सन्मानपूर्वक व्हावी यासाठी प्रयत्न असल्याचंही अजित पवार म्हणाले.

Updated: Jan 29, 2017, 04:31 PM IST
पुण्यात सन्मानपूर्वक आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न - अजित पवार title=

पुणे : पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीची बोलणी सुरु असून आज निर्णय व्हावा अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. आघाडी व्हावी अशी आपली इच्छा असून ती सन्मानपूर्वक व्हावी यासाठी प्रयत्न असल्याचंही अजित पवार म्हणाले.

अजित पवारांनी यावेळी शिवसेना आणि भाजपवरही तोंडसुख घेतलंय. युती वैचारिक कारणावरुन नाहीतर जागावाटपावरुन तुटल्याचं ते म्हणालेत. शिवसेनेचे शहर संघटक सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. टिंगरे हे मूळचे राष्ट्रवादीचेच होते. मात्र मागील वेळी पालिकेची उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर वडगाव-शेरीमधून विधानसभा निवडणूकसुद्धा लढवली होती. मात्र आता पालिका निवडणुकीच्या तोंडावर टिंगरे यांची घरवापसी झाली आहेय