परभणीत राष्ट्रवादीला काँग्रेसकडून दे धक्का, शिवसेना-भाजप सात-सात

महापालिकेच्या ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पुणे, पिंपरी-चिंचवड गमावल्यानंतर आता परभणीतील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर होते. येथे मित्रपक्ष काँग्रेसने सत्ता काबीज केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 21, 2017, 02:47 PM IST
परभणीत राष्ट्रवादीला काँग्रेसकडून दे धक्का, शिवसेना-भाजप सात-सात

परभणी : महापालिकेच्या ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात होते. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पुणे, पिंपरी-चिंचवड गमावल्यानंतर आता परभणीतील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर होते. येथे मित्रपक्ष काँग्रेसने सत्ता काबीज केली.

राष्ट्रवादीसमोर शिवसेनेने  आव्हान निर्माण केले होते. मात्र, काँग्रेसने येथे बाजी मारल्याचे दिसून येत आहे. भाजपला परभणीत फारशा अपेक्षा नव्हत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा बाजी मारणार का, याची उत्सुकता होती. मात्र, काँग्रेसने मोठा हादरा दिला.

पालिकेत काँग्रेस ३१, राष्ट्रवादी १० तर शिवसेना आणि भाजप प्रत्येकी ७ जागांवर आघाडी मिळवली आहे. येथे राष्ट्रवादीची सत्ता काँग्रेसने आपल्या हातात घेतली आहे. तर शिवसेनाला येथे प्रभाव पाडता आलेला नाही. भाजपला फारशी चमक दाखवता आलेली नाही.

आधीची स्थिती

गतवर्षी राष्ट्रवादी ३०, काँग्रेस २३, शिवसेना ८, भाजप २ आणि अपक्ष २ असे पक्षीय बलाबल होते.