अल्पवयीन मुलीवर बलात्कार, काँग्रेस नेत्याच्या दोन मुलांना अटक

शहरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आलीय. ही दोन्ही मुलं एका काँग्रेस नेत्याची आहेत. 

Updated: May 4, 2016, 10:41 AM IST
अल्पवयीन मुलीवर बलात्कार, काँग्रेस नेत्याच्या दोन मुलांना अटक title=
संग्रहित

परभणीत : शहरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आलीय. ही दोन्ही मुलं एका काँग्रेस नेत्याची आहेत. 

दोन्ही आरोपी महिला काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या माजी जिल्हाध्यक्षा जानुबी शेख शिकुर यांची मुलं आहेत. दोन्ही मुलांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार मुलीच्या आईनं केलीय. 

याप्रकरणी  दोघा भावांविरुद्ध बलात्कार आणि अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झालाय. त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यावर तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय.

शेख अफरोज तथा राजू आणि त्याचा मोठा भाऊ शेख शाहरुख, अशी या आरोपींची नाव आहेत. दोन्ही नराधमांनी बलात्कार केल्यानं मुलगी गर्भवती राहिल्याचंही समोर आलंय. दोन्ही आरोपींनी ब्लॅकमेल करुन तिचा शारीरिक छळ केल्याचाही मुलीच्या आईचा आरोप आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडालीय.