एमआयएम-काँग्रेसचा वाद टोकाला ,MIMवर बंदी घाला - प्रणिती शिंदे

 मी कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलत नाही. मी देशाच्या बाबतीत म्हणत आहे. देशद्रोहीना आपल्या देशात जागा असता कामा नये. त्यांनी (एमआयएम) कोणत्याही समाजाविषयी भूमिका घेतलेली नाही. त्यानी देशाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते देशद्रोही आहेत, असा बोल करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी बंदीची मागणी केली.

Updated: Nov 6, 2014, 03:27 PM IST
एमआयएम-काँग्रेसचा वाद टोकाला ,MIMवर बंदी घाला - प्रणिती शिंदे title=

सोलापूर : मी कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलत नाही. मी देशाच्या बाबतीत म्हणत आहे. देशद्रोहीना आपल्या देशात जागा असता कामा नये. त्यांनी (एमआयएम) कोणत्याही समाजाविषयी भूमिका घेतलेली नाही. त्यानी देशाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते देशद्रोही आहेत, असा बोल करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी बंदीची मागणी केली.

देशाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे.त्यांच्या प्रकक्षोभ भाषणावर आणि वाटचालीवर पोलिसांनी बंदी घोतली पाहिजे, आमदार प्रणिती यांनी म्हटलंय.

एमआयएम आणि काँग्रेसचा वाद टोकाला गेलाय. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएमची माफी मागावी, अशी मागणी एमआयएमचे अध्यक्ष असादउद्दीन ओवेसी यांनी केलीय.

केंद्रातील युपीए सरकारमध्ये असताना एमआयएम जातीयवादी नव्हती का असा सवाल त्यांनी शिंदे यांना केलाय. प्रणिती शिंदे यांनी एमआयएम जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप करत बंदी घालण्याची मागणी काल केली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.