सांगलीकरांच्या माथी कृष्णेचंच दूषित पाणी

शुद्ध आणि पुरेसं पिण्याचं पाणी मिळावं यासाठी सांगलीकर अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. मात्र पालिका सत्ताधा-यांच्या निष्क्रियतेमुळे आजही ती मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. 

Updated: Dec 27, 2015, 09:50 PM IST
सांगलीकरांच्या माथी कृष्णेचंच दूषित पाणी title=

सांगली : शुद्ध आणि पुरेसं पिण्याचं पाणी मिळावं यासाठी सांगलीकर अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. मात्र पालिका सत्ताधा-यांच्या निष्क्रियतेमुळे आजही ती मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. 

सांगील मिरज कुपवाडा महापालिकेत २००८ मध्ये नव्याने सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी प्रणित विकास महाआघाडीनं वारणा उद्भव पाणी योजनेचं मूळ स्वरुप बदलून, सांगलीकरांच्या माथी कृष्णेचंच दूषित पाणी मारलं. त्यानुसार कृष्णा नदीतलं पाणीही शुद्ध करून नागरिकांना देता येतं असं सांगत, माळ बंगला इथे ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचं काम हाती घेण्यात आलं. मात्र ते काम त्यांच्या काळात पूर्ण झालंच नाही.

शुद्ध पाणी देण्याचं आश्वासन देत सांगली महापालिकेत २०१३ साली काँग्रेस सत्तेवर आली. मात्र त्यानंतर काँग्रेसचे सत्ताधारीही शुद्ध पाण्याचं आपलं आश्वासन विसरले.

माळ बंगला इथल्या जलशुद्धीकरण केंद्रातत साचलेला गाळ कित्येक वर्षांपासून काढलाच गेला नाही. त्यामुळे तो गाळ थेट फिल्टरमध्ये जातो. तर अप्रशिक्षित कर्मचा-यांमुळे क्लोरीन आणि पी ए सी पावडरचा डोस योग्य प्रमाणात दिला जात नाही. परिणामी अनेक वेळा अशुद्ध पाणीच नागरिकांच्या वाट्याला येतं. खेरीज पाणी गळती सुरु आहे ती वेगळीच.