जयंत पाटलांचा वादग्रस्त व्हिडिओ जाहीर

माजी मंत्री जयंत पाटील यांची वादग्रस्त वक्तव्याची क्लिप जनतेसमोर आल्यानं एकच खळबळ उडालीय. कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी ही क्लिप प्रसारमाध्यमांना दिली. 

Updated: Feb 23, 2017, 07:57 AM IST
जयंत पाटलांचा वादग्रस्त व्हिडिओ जाहीर title=

सांगली : माजी मंत्री जयंत पाटील यांची वादग्रस्त वक्तव्याची क्लिप जनतेसमोर आल्यानं एकच खळबळ उडालीय. कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी ही क्लिप प्रसारमाध्यमांना दिली. 

या व्हिडिओ क्लिपमध्ये माजी मंत्री जयंत पाटील पोलीस अधिकाऱ्याला दमबाजी करताना दिसत असल्याचा आरोप खोत यांनी केलाय. 

'मंत्र्यांची काय लायकी आहे ती माहिती आहे... त्या मंत्र्यांला घाला गोळी, तुम्ही या लवकर... तुम्ही आला नाहीच तर गाड्या काढून मी स्वतः तुम्हाला शोधायला येईन... मी सरळ मार्गाने सांगतोय...' अशी वक्तव्य पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना जयंत पाटील करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. 

सोबतच, 'दंगा भडकवण्यात जयंत पाटील हे किती माहिर आहेत, हे सांगली जिल्ह्याला माहित आहे' असा आरोपही कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलाय. 

दरम्यान, सुरक्षेच्या नावाखाली नदाफ हे पोलीस अधिकारी रात्री दोन वाजता मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मागे फिरत होते. याच नदाफ यांनी निशिकांत पाटील यांना पळवून लावलं होतं.. नेमका काय प्रकार काय होता, हे सांगण्यासाठीच मी नदाफ यांना बोलवत होतो... आणि 'गोळी मार' म्हणजे त्यांना सोडा आणि इकडे... अशा आशयाने मी नदाफ यांच्याशी बोलत होतो... असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी याप्रकरणावर दिलंय.