धावत्या रेल्वेतून प्रेमी युगूलाची उडी, तरुणाचा मृत्यू

एका प्रेमी जोडप्यानं धावत्या रेल्वेतून उडी घेतलीय. त्यात तरुणाचा मृत्यू झाला असून तरुणी गंभीर जखमी आहे.

Updated: Sep 13, 2016, 06:46 PM IST
धावत्या रेल्वेतून प्रेमी युगूलाची उडी, तरुणाचा मृत्यू title=

नांदेड : एका प्रेमी जोडप्यानं धावत्या रेल्वेतून उडी घेतलीय. त्यात तरुणाचा मृत्यू झाला असून तरुणी गंभीर जखमी आहे.

नांदेड शहरातल्या बाफना रेल्वे उड्डाणपुलाखाली ही घटना घडलीय... हे प्रेमी युगुल काही दिवसांपूर्वी पळून गेलं होतं.

 तरुणीच्या आईनं त्यांचा शोध घेतला.

त्यांना पुन्हा नांदेडकडे घेऊन येत असताना त्यांनी रेल्वेतून उडी घेतली. जखमी तरुणीवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरूय.

 तरुणाच्या खिशात सुसाईड नोट मिळालीय. स्वखुशीनं आत्महत्या करत असल्याचा त्यात उल्लेख आहे.