दलित हत्याकांड : गुन्हा कबुल करण्यासाठी आमच्यावरच दबाब - कुटुंबीय

जवखेडा इथल्या जाधव कुटुंबियातील तिघांच्या झालेल्या हत्याकांडप्रकरणी पीडित कुटुंबियातील व्यक्तीनीच गुन्हा कबूल करावा, असा दबाव काही पोलिसांकडून टाकला जात असल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे.

Updated: Nov 25, 2014, 07:42 PM IST
दलित हत्याकांड : गुन्हा कबुल करण्यासाठी आमच्यावरच दबाब - कुटुंबीय title=

अहमदनगर : जवखेडा इथल्या जाधव कुटुंबियातील तिघांच्या झालेल्या हत्याकांडप्रकरणी पीडित कुटुंबियातील व्यक्तीनीच गुन्हा कबूल करावा, असा दबाव काही पोलिसांकडून टाकला जात असल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबियांनी केला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा कबूल करण्यासाठी काही पोलिसांकडून एक लाख रूपये देण्याचे आमिषही दाखवलं जात असल्याचं जाधव कुटुंबियांचं म्हणणं आहे. आम्ही संशयित आरोपी म्हणून नावं दिलेल्या गावातील व्यक्तींची चौकशी न करता काही पोलीस जाधव कुटुंबियानाच यामध्ये गुंतवून दलित आंदोलनाला वेगळी दिशा दिली जात असल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केलाय.

महिना उलटूनही आरोपींना अटक होत नसल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात दलित हत्याकांड विरोधात आंदोलन पेटले आहे. तपास लागत नसल्याने पोलिसांविषयी तीव्र नाराजी असतानाच जाधव कुटुंबियांच्या या आरोपामुळं पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 

हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून झाल्याचा आरोप आरपीआय सेक्यूलरचे अध्यक्ष शामदादा गायकवाड यांनी केलाय. मुंबईत पत्रकार परिषद घेवून कुटुंबियांनी पोलिसांविरोधात आरोप केलेत.

गुन्हा कबुल करण्यासाठी मला १ लाख रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याचे मोठा मृत संजयचा मोठा भाऊ दिलीप जाधव यांनी सांगितले. तसेच माझ्यावर गुन्हा कबुल करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा दावा, रवींद्र जाधव यांने केलाय. तर आम्हाला न्याय मिळाला नाही तर सरकारच्या दारात आत्महत्या करु, असा इशारा संजयची आई साखराबाई जाधव यांनी दिलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.