धुळे जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचं वादळ 

अवघ्या चार तालुक्यांच्या धुळे जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचं वादळ पाहायला मिळालं... धुळ्यात मराठा क्रांती मूक मोर्चाला मराठा समाजाचं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Updated: Sep 28, 2016, 07:04 PM IST
धुळे जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचं वादळ  title=

धुळे : अवघ्या चार तालुक्यांच्या धुळे जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचं वादळ पाहायला मिळालं... धुळ्यात मराठा क्रांती मूक मोर्चाला मराठा समाजाचं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जिल्हा लहान असला तरी या मोर्चाला मराठा समाजाच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यात महिला आणि तरुणाईची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. 

कोपर्डी घटनेतील बलात्काराच्या आरोपीला फाशी, मराठा समाजाला आरक्षण आणि ऍट्रॉसिटीचा पुनर्विचार या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.