डॉन अरूण गवळीला नागपूर जेलमध्ये हलविले

कुख्यात माफिया डॉन अरूण गवळी याला तळोजा जेलमधून नागपूर जेलमध्ये हलवण्यात आलंय. यामागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. त्याला धोका असल्याने हलविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Updated: Mar 17, 2015, 10:17 AM IST
डॉन अरूण गवळीला नागपूर जेलमध्ये हलविले title=
छाया - डीएनए

नागपूर : कुख्यात माफिया डॉन अरूण गवळी याला तळोजा जेलमधून नागपूर जेलमध्ये हलवण्यात आलंय. यामागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. त्याला धोका असल्याने हलविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

अरुण गवळीला सुरक्षेच्या कारणास्तव त्याला नागपूर जेलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र तळोजा जेलमध्ये अरूण गवळीच्या जीवाला धोका असल्याचं समजतंय. 

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात अंडासेलमध्ये त्याला पाच ते सहा महिने ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खंडणी, खून, अपहरण आदी गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. 

अरुण गवळीच्या जीवनावर 'डॅडी' नावाचा हिंदी चित्रपट येत आहे. मध्यंतरी अभिनेता अर्जुन रामपाल याने त्याची भेट घेतल्याची चर्चा होती. यामुळे अर्जुन रामपाल चांगलाच अडचणीत आला होता. या चित्रपटामुळे अरुण गवळी पुन्हा चर्चेत आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.