धक्कादायक, सासूने सूनेसह तिच्या आईचा गळा चिरला

आपल्या पोटच्या मुलाचे घर सक्ख्या आईनेच उध्वस्त केल्याची घटना मुंब्रा येथे घडली आहे. आरोपी  रशिदा अकबर वासानी या महिलेने आपली सून आणि तिच्या आईचा धारदार शास्त्राने गळा चिरून खून केला. या खूनानंतर तिने स्वतःला मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केले.    

Updated: Aug 9, 2016, 07:29 PM IST
धक्कादायक, सासूने सूनेसह तिच्या आईचा गळा चिरला title=

ठाणे : आपल्या पोटच्या मुलाचे घर सक्ख्या आईनेच उध्वस्त केल्याची घटना मुंब्रा येथे घडली आहे. आरोपी  रशिदा अकबर वासानी या महिलेने आपली सून आणि तिच्या आईचा धारदार शास्त्राने गळा चिरून खून केला. या खूनानंतर तिने स्वतःला मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन केले.    

मुंब्रा येथे राहणाऱ्या मखदूम वासना याचा विवाह चार वर्षांपूर्वी सलमा हिच्याशी झाला. लग्नानंतर ते दोघेही खूश होते. मात्र, सासूला सून आवड नव्हती. त्यामुळे मुलापासून तिला वेगळे करण्यासाठी प्रयत्न ती करत होती. आपला मुलगा बायकोचे ऐकतो, माझे ऐकत नाही. तो आपल्याला पुरेसे पैसे देत नाही, याचा राग रशिदाला होता.

रशिदाही वेगळी राहत होती. तसेच सलमाला मूल झाल्यानंतर सलमाची आई लेकीकडे आली होती. ती तिच्यासोबत राहत होती. आधीचा राग आणि त्यात सूनेची आई राहत असल्याने रागात अधिकच भर पडली. तिने या दोघींना संपविण्याचा निर्णय घेतला. या दोघींचा काटा काढण्यासाठ ती चार दिवसांपूर्वीच आपली मुलाकडे येऊन राहू लागली होती.

रशिदा हिने सलमा आणि तिच्या आईच्या जेवणात झोपेच्या गोळ्या घातल्या. जेवण झाल्यानंतर दोघींना गाढ झोप लागली. त्यानंतर तिने दोघींचा गळा धारदार शास्त्राने चिरला. रशिदा हिला आपण केलेल्या कृत्याचा कोणताच पश्चाताप दिसून येत नव्हता. तिने स्वतःच मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. तिच्या या कृत्याने संपूर्ण मुंब्रा शहरात खळबळ उडाली आहे.