ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. रा. चिं. ढेरे यांचे निधन

संत साहित्याचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. रा. चिं. ढेरे यांचे येथे राहत्या घरी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी धार्मिक आणि संत साहित्यावर खूप पुस्तके लिहिली आहेत.

Updated: Jul 1, 2016, 09:24 AM IST
ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. रा. चिं. ढेरे यांचे निधन title=

पुणे : संत साहित्याचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. रा. चिं. ढेरे यांचे येथे राहत्या घरी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी धार्मिक आणि संत साहित्यावर खूप पुस्तके लिहिली आहेत.आज दुपारी बारा वाजता त्यांच्यावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यापूर्वी ११.३० वाजता त्यांचे पार्थिव साहित्य परिषदेमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी आज त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ढेरेंनी नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय यांचा इतिहास जगसमोर मांडाला. याशिवाय तुळजाभवानी आणि करवीर निवासिनी महालक्ष्मी ही पुस्तकंही गाजली. डॉ. अरुणा ढेरे आणि वर्षा गजेंद्रगडकर या त्यांच्या कन्या आहेत. ढेरे यांचा दैवतशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयात विशेष अभ्यास होता.

ढेरेंचा जन्म पुण्याजवळच्या निगडीत झाला. त्यांनी भारतीय रंगभूमीच्या शोधात, हा संशोधनपर ग्रंथही लिहिला. १०५ पुस्तकं लिहून त्यांनी महाराष्ट्राची साहित्य परंपरेत मोलाची भर घातली. साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र सरकारनं त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरव केला. 

त्यांची काही साहित्य संपदा 

- आज्ञापत्र
- दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा
- दत्त संप्रदायाचा इतिहास
- ज्ञानदेव आणि ज्ञानदेवी
- गंगाजळी
- कर्तृत्वाचे महामेरु : भाग १ ते ३
- करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी
- लज्जागौरी
- लोकदैवतांचे विश्‍व
- लोकसाहित्य शोध आणि समीक्षा
- लोकसंस्कृतीचे उपासक
- मुरारिमल्लविरचित बालक्रीडा
- मुसलमान मराठी संतकवी
- नाथ संप्रदायाचा इतिहास
- पवित्र महाराष्ट्र : भाग १ ते ८
- संपूर्ण पंचतंत्र
- संत, लोक आणि अभिजन
- श्रीविठ्ठल : एक महासमन्वय
- श्री आनंदनायकी
- श्रीनामदेव - जनी आणि नागरी
- श्रीपर्वताच्या छायेत

ढेरे यांना मिळालेले पुरस्कार 

- साहित्य अकादमी पुरस्कार १९८७ 
- ‘श्रीविठ्ठल: एक महासमन्वय‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचागं.ना. जोगळेकरपुरस्कार(२०१३) 
- त्रिदल फाउंडेशनचा पुण्यभूषण पुरस्कार (१४ मार्च २०१०) 
- पुणे महानगरपालिकेचामहर्षीवाल्मीकीपुरस्कार (२०१३) 
- अखिल भारतीय यादव महासंघाचा विशेष पुरस्कार (२०१५) 
- चिमण्या गणपती मंडळातर्फे लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक व संशोधक रा. चिं. ढेरे यांना ‘साहित्य सेवा सन्मान‘ त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. (२०१६)