'सर्व धर्म मन विठोबाचे नाम'... 'वारी'साठी 'ईद' पुढे ढकलली!

पंढरी वारीच्या निमित्ताने लोणंदमध्ये मुस्लिम बांधवांनी एक अनोखा उपक्रम राबविला. 

Updated: Jul 17, 2015, 08:37 PM IST
'सर्व धर्म मन विठोबाचे नाम'... 'वारी'साठी 'ईद' पुढे ढकलली! title=

लोणंद,सातारा : पंढरी वारीच्या निमित्ताने लोणंदमध्ये मुस्लिम बांधवांनी एक अनोखा उपक्रम राबविला. 

पंढरपूरच्या दिशेने हरिनामाचा जयघोष करत निघालेल्या माऊलींच्या पालखी सोहळ्यानं पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सातारा जिल्ह्यात प्रवेश केलाय. सातारा जिल्ह्यातील लोणंदनगरीत या पालखी सोहळ्याचं दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी थाटामाटात स्वागत करण्यात आलं. पण, यावेळचं वैशिष्ट्य आणखी खास होतं. लोणंदमधील मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन माऊलींसह असलेल्या लाखो वारक-यांचं मोठ्या आनंदानं स्वागत केलं. 


वारकऱ्यांची वाटचाल सुरूच

एव्हढंच नाही तर शनिवारचा ईदचा सण एक दिवस पुढे ढकलून रविवारी साजरा करण्याचा निर्णय घेत हिंदू-मुस्लिम एकतेचा एक नवा आदर्श जगासमोर मांडला.

लोणंदमधील भाविकांकडून तर या उपक्रमाचं कौतुक झालंच, मात्र त्याचबरोबर समाज आरतीमध्येही सोहळा प्रमुखांकडून आणि उपस्थित वारक-यांकडून मुस्लिम बांधवांचे विशेष आभार मानण्यात आले आणि या त्यांच्या उपक्रमाचं खास कौतुक करण्यात आलं.

थोडक्यात जातीपातीचं राजकारण करण्यातच सतत मशगूल असणा-या राजकारण्यांसाठी लोणंदमधील हिंदू-मुस्लिम एकतेचा हा परिपाठ डोळ्यात अंजन घालणारा ठरेल आणि भेदाभेद अमंगळ ही संतांची शिकवण पुन्हा एकदा नव्याने नवीदृष्टी देईल, अशी आशा करूयात.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.