काल इमारतीचं उद्घाटन, आज कोसळली लिफ्ट

कोल्हापुर जिल्हा आणि सत्र न्यायालयातील लिफ्ट कोसळलीय.

Updated: Feb 8, 2016, 06:59 PM IST
काल इमारतीचं उद्घाटन, आज कोसळली लिफ्ट title=

कोल्हापूर: कोल्हापुर जिल्हा आणि सत्र न्यायालयातील लिफ्ट कोसळलीय. काल उद्घाटन झालेल्या या न्यायालयाच्या नविन इमारतीतील 3 नंबरची लिफ्ट कोसळली असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी नाही.

उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमुर्ती विजया ताहिलरमाणी यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन झालं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.