अकरा दिवसांत सहावा दरोडा, येवल्यात शेकऱ्याला लुटले

 येवल्यात दरोडेखोरांचा धुमाकुळ सुरुच आहे. अंगुलगावात दरोडेखोरांनी गेल्या अकरा दिवसांत सहावा दरोडा टाकलाय. अंगुलगाव येथे दत्ता जाधव या शेतकऱ्यांच्या सुमारे १० दरोडेखोरांनी घरावर दरोडा टाकीत ५९ हजार रुपये लुटले. आजच्या घटनेने अंगुलगावकरांसह तालुका हादरला आहे.

Updated: May 5, 2015, 11:40 AM IST
अकरा दिवसांत सहावा दरोडा, येवल्यात शेकऱ्याला लुटले title=

नाशिक : येवल्यात दरोडेखोरांचा धुमाकुळ सुरुच आहे. अंगुलगावात दरोडेखोरांनी गेल्या अकरा दिवसांत सहावा दरोडा टाकलाय. अंगुलगाव येथे दत्ता जाधव या शेतकऱ्यांच्या सुमारे १० दरोडेखोरांनी घरावर दरोडा टाकीत ५९ हजार रुपये लुटले. आजच्या घटनेने अंगुलगावकरांसह तालुका हादरला आहे.

यात या शेतक-याला दरडेखोरांनी लोखंडी शिगेनं मारहाणही केलीये. विशेष म्हणजे दहा दिवसांपुर्वीच अंगुलगाव येथे १५ ते २० दरोडेखोरांनी धुमाकुळ घालीत ५ दरोडे टाकले होते त्यातून सावरत असताना आजच्या घटनेने अंगुलगावकरांसह तालुका हादरला आहे.

आज पहाटे १.३० च्या सुमारास दत्ता जाधव हे लघुशंकेकरिता उठले असता त्यांना दरोडेखोरांनी चाकू आणि गजाचा धाक दाखवून घरात नेले आणि पैश्याची मागणी केली. दत्ता जाधव यांच्या घरात काहीही सापडत नसल्याने दरोडेखोरांनी त्यांस लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत चाकू आणि गजाचा धाक दाखविला. मारहाणीनंतर दत्ता जाधव यांनी मक्याच्या गोणीत  ५९ हजार रुपये ठेवलेले असल्याचे सांगीतले. ते पैसे घेऊन दरोडेखोर फरार झाले. घरात दत्ता जाधव हे एकटेच होते. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत जाधव जबर जखमी झाले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.