ईव्हीएम मशीनबद्दल पहिल्यांदा बोलले शरद पवार...

'ईव्हीएम मशीन हे पराभवाचं कारण असू शकत नाही. पराभव हा पराभवच असतो', असे नमूद करताना चुका दुरुस्त करून आपण येणाऱ्या निवडणुका लढण्यासाठी सज्ज व्हायला हवं, असं आवाहन आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 6, 2017, 10:38 PM IST
 ईव्हीएम मशीनबद्दल पहिल्यांदा बोलले शरद पवार... title=

ठाणे : 'ईव्हीएम मशीन हे पराभवाचं कारण असू शकत नाही. पराभव हा पराभवच असतो', असे नमूद करताना चुका दुरुस्त करून आपण येणाऱ्या निवडणुका लढण्यासाठी सज्ज व्हायला हवं, असं आवाहन आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे 

-काहींना यश आलं तर काहींना अपयश आलं
-ठाण्याची निवडणूक यावेळी थोडी अडचणीची होती
-काँग्रेस सोबत युती नव्हती
-नगरसेवक म्हणून काम करणारे काही नगरसेवक आम्हाला सोडून गेले
-हे जर झालं नसत तर आणखी 10 ते 15 जागा आमच्या वाढल्या असत्या
-पुणे आणि चिंचवड मध्ये सेटबॅक बसला आहे
-आणखी काही दुरुस्ती कार्याची अवशक्यता असेल तर ती केली जाईल
- सत्तेचा वापर सत्ताधाऱ्यांनी करून सुध्दा राज्यात दोन नंबरचा पक्ष राहिला
जिथे कमी पडलो तिथे दुरुस्ती करतोय
- मात्र पहिल्यांदा पाहायला मिळतंय सत्तेचा आणिसाधन संपत्तीचा वापर करण्यात आला हि आमची अडचण आहे

- लोकशाहीत निवडणुकीत यश अपयश असत या वेळीच निवडणूक अडचणीची होती काँग्रेस बरोबर योग्य युती होऊ शकली नाही  तसेच काही सहकार्यांनी पक्षांतर केलं या मूळ फटका बसला

- पुणे आणि पिंपरी चिंचवड ला फटका बसला अजून दुरुस्ती करण्याची गरज जिल्हा परिषदेत क्रमांक 2 चा जागा मिळाली

- सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा वापर केला राष्ट्रवादी चा प्रत्येक कार्यकर्त्यांनी विजय मिळाला त्यांचं अभिनंदन करत असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं

पहिल्यांदाच राज्यात साधन संपत्तीचा वापर केला

पुण्यात फटका बसला ग्रामीण भागात फटका बसला नाही

निवडणुकीत evm मशीन बाबत कारण न घेता पराभव कामाला लाग असा संदेश दिला आहे

ईवीएम मशीन हे पराभावचे कारण असू शकत नाही, आम्ही तस मानत नाही, पराभव हा पराभव असतो, चूका दुरुस्त करून पुन्हा निवडणूक लढवू

भाजपने प्रयत्न मुंबई पालिकेत पराभव दिसला त्यामुळं भाजपने माघार घेतली

मुंबई मध्ये बीजेपीने माघार घेतली तर त्यांना खात्री वाटली असेल की त्यांचा उमेदवार येऊ शकत नाही, सत्ता वाचवन्यसाठी त्यांनी कदाचित हे केले असेल

आमदार परिचारक यांचं विधान बेजबाबदार आहे

अरक्षणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर टीका धनगर आणि मराठा अरक्षणवरून

कुठे नेऊन ठेवला महारष्ट्र हि जाहिरात आम्ही निवडणुकीच्या काळात पहिली आहे

आमचा कडे पैशे नाहीत अस बोलून शरद पवार यांची पत्रकार परिषद संपली