पुण्यात बोगस आयपीएस अधिकाऱ्याला अटक

येथील कोरेगाव परिसरात रुबाबात फिरणाऱ्या बोगस आयपीएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. श्रीकांत पवार असं या बोगस अधिकाऱ्याचं नाव आहे.

Updated: Aug 29, 2015, 11:14 PM IST
पुण्यात बोगस आयपीएस अधिकाऱ्याला अटक  title=

पुणे : येथील कोरेगाव परिसरात रुबाबात फिरणाऱ्या बोगस आयपीएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. श्रीकांत पवार असं या बोगस अधिकाऱ्याचं नाव आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात तो बोगस असल्याचं स्पष्ट झालं. बनावट आयपीएस म्हणून वावरत असताना, पवारनं मंगलदास पोलिस चौकीला भेट देऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना नाईट राऊंडचे धडे दिले. सोलापूरच्या श्रीकांतची आयपीएस होण्याची खूप इच्छा होती. मात्र, परीक्षेतील अपयशानं खचलेल्या पवारनं आयपीएस झालो असल्याची बतावणी सुरु केली. 

कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनाला गेल्यावरही पवारनं आपण आयपीएस असून आताच पोलीस आयुक्तांना भेटून आल्याची बतावणी सुरु ठेवली होती. मात्र लवकरच सर्व बनाव पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्याला अटक करण्यात आली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.