शेतकरी 'बापावरचं ओझं' कमी करण्यासाठी मुलीनं दिला जीव

एकीकडे लातूरच्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टीला ऑनलाईन व्यवहार केल्यामुळे एक कोटीची लॉटरी लागली. तर दुसरीकडे याच लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकऱ्याच्या मुलीनं शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केलीय.

Updated: Apr 14, 2017, 11:38 PM IST
शेतकरी 'बापावरचं ओझं' कमी करण्यासाठी मुलीनं दिला जीव title=

लातूर : एकीकडे लातूरच्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टीला ऑनलाईन व्यवहार केल्यामुळे एक कोटीची लॉटरी लागली. तर दुसरीकडे याच लातूर जिल्ह्यातील भिसेवाघोली येथे शेतकऱ्याच्या मुलीनं शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केलीय.

शीतल वायाळ असं या २१ वर्षांच्या मुलीचं नाव आहे. सततची नापिकी, हलाखीची आर्थिक परिस्थिती तसेच लग्नासाठी कर्ज मिळत नसल्यामुळे कंटाळून विहिरीत उडी मारून शितलनं आपली जीवनयात्रा संपवली.


आत्महत्येपूर्वी शितलनं लिहिलेली चिठ्ठी

 

आपली जीवनयात्रा संपविली. दोन बहिणींचे कसे-बसे लग्न करणाऱ्या आपल्या वडिलांना आपल्या लग्नासाठी कुणी कर्जही देत नाहीत त्यामुळे नापिकी-आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचं पत्र लिहून ठेवलं.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडालीय. चिंताजनक म्हणजे, गेल्या वर्षी भिसेवाघोली येथील मोहिनी भिसे या शेतकऱ्याच्या मुलीनेही याच कारणासाठी आत्महत्या केली होती... आत्महत्येचं लोण आता शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत पोहचलंय, हे या घटनेतून होतंय.