तूर खरेदी बंद केल्यानं जालन्यात शेतकरी संतप्त

नाफेडनं शेतक-यांची तूर खरेदी बंद केल्यानं शेतकरी चांगलाच संतप्त झालाय. जालन्यातील संतप्त शेतक-यांनी तूर खरेदी बंद झाल्यानं घनसावंगी तालुक्यातील तीर्थपूरीमध्ये अंबड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते.

Updated: Apr 24, 2017, 04:42 PM IST
तूर खरेदी बंद केल्यानं जालन्यात शेतकरी संतप्त  title=

जालना : नाफेडनं शेतक-यांची तूर खरेदी बंद केल्यानं शेतकरी चांगलाच संतप्त झालाय. जालन्यातील संतप्त शेतक-यांनी तूर खरेदी बंद झाल्यानं घनसावंगी तालुक्यातील तीर्थपूरीमध्ये अंबड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते.

मध्यंतरी राज्यसरकारच्यावतीनं सुरु करण्यात आलेल्या तूर खरेदी केंद्रावरील बारदाना संपला होता. त्यामुळे तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आलं होतं.त्यामुळे साहजिकच शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेली तूर तशीच पडून होती.त्यानंतर तूर खरेदीला मुदतवाढ देउनही सर्व शेतक-यांची तूर नाफेडनं अजूनही खरेदी केलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत आमची तूर विक्री होत नाही तोपर्यंत आम्ही तुर उचलून नेणार नाही अशी भूमिका संतप्त शेतक-यांनी घेतली आहे.