डोंबिवलीत महिला होमगार्डला मारहाण

डोंबिवलीमध्ये वाहतूक नियंत्रणाचे काम करणा-या महिला होमगार्ड सुनिता नारायण नंदमेहर यांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. गुप्ता नामक मुजोर रिक्षाचालकाने ही मारहाण केलीये.  

Updated: Mar 19, 2017, 06:09 PM IST
डोंबिवलीत महिला होमगार्डला मारहाण title=

डोंबिवली : डोंबिवलीमध्ये वाहतूक नियंत्रणाचे काम करणा-या महिला होमगार्ड सुनिता नारायण नंदमेहर यांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. गुप्ता नामक मुजोर रिक्षाचालकाने ही मारहाण केलीये.  

घटनेनंतर तो फरार झालाय. इतकंच नव्हे तर या महिला होमगार्डला रिक्षामध्ये जबरदस्ती बसवून भलत्याच ठिकाणी नेऊन मारहाण केली आणि गटारात फेकून दिलंय. तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 

रामनगर पोलीस ठाणे हद्दीत सुनीता आपले कर्तव्य बजावत असताना गुप्ता नावाच्या रिक्षा ड्राईव्हरला नो पार्किंग मध्ये गाडी लावू नको सांगितलं. याचा राग आल्याने रिक्षाचालकाने सुनीता यांच्याशी हुज्जत घातली. 

नंतर रिक्षा पोलीस चौकीला न नेता भलतीकडेच नेऊन सुनीता यांना मारहाण केली आणि रिक्षेबाहेर फेकून दिलं. mh 05 cg 2138 असा रिक्षा क्रमांक आहे. डोंबिवली पोलिस पुढील तपास करत आहेत.