अनिष्ट रूढींना विरोध केला म्हणून मोरे कुटुंब वाळीत

समाजातल्या अनिष्ट रूढींना विरोध केला म्हणून संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याची तक्रार एका महिलेनं केलीय. पुणे जिल्ह्यातल्या पारगावमधली ही घटना आहे. याठिकाणी राहणाऱ्या अनिता मोरे या वडार समाजातल्या महिलेला जातपंचायतीचा हा अनुभव आलाय.  

Updated: May 20, 2015, 05:45 PM IST
अनिष्ट रूढींना विरोध केला म्हणून मोरे कुटुंब वाळीत  title=

पुणे: समाजातल्या अनिष्ट रूढींना विरोध केला म्हणून संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याची तक्रार एका महिलेनं केलीय. पुणे जिल्ह्यातल्या पारगावमधली ही घटना आहे. याठिकाणी राहणाऱ्या अनिता मोरे या वडार समाजातल्या महिलेला जातपंचायतीचा हा अनुभव आलाय.  

कशाला विरोध केला अनिता मोरेने...

  • गावात देवीच्या मंदिरासमोर होते पशूहत्या 
  • पोतराजाचे खेळ, देवी अंगात येणे असे दांभिक प्रकार होतात
  • पित्रविधीच्या नावाखाली होतात अनिष्ट कृत्ये
  • देवीच्या यात्रेसाठी पैसे उकळले जातात
  • पैसे दिले नाही तर कुटुंबाला वाळीत टाकलं जातं
  • हे सगळे प्रकार करते जातपंचायत

पारगावच्या अनिता मोरे आणि त्यांचे पती उल्हास मोरे या सगळ्या गोष्टींना वैतागले. त्यांनी या भंपकपणाला विरोध केला म्हणून संपूर्ण मोरे कुटुंबालाच वाळीत टाकण्यात आलंय. 
 
अनिता मोरे यांनी लढवलेली ग्राम पंचायतीची निवडणूकही जातपंचायतीला मान्य नाही. देवीच्या मंदिराकडे जाण्याच्या रस्त्याखाली मोरे यांच्या शौचालयाचा सेप्टीक टँक आहे. त्यामुळं देवीची विटंबना होते असाही अजब दावा जातपंचायतीचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. अखेर मोरे कुटुंबियांनी अंनिसला साद दिली. 

अंनिसनं या प्रकाराविरोधात आता आंदोलन सुरू केलंय. मोरे कुटुंबियांनी जातपंचायतीच्या छळाविरोधात पोलिसांतही तक्रार नोंदवली आहे. या प्रकाराची तातडीनं दखल घेतली जाऊन दोषींवर तातडीनं कारवाई होणं गरजेचं आहे. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.