१४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, महाविद्यालयाचे संस्थाचालक, शिक्षकांवर गुन्हा

रायगड जिल्ह्यातील मुरुडमधील समुद्रात पुणे कॅम्प भागातील आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी आज मंगळवारी महाविद्यालयाचे संस्थाचालक आणि सहल घेऊन गेलेल्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Updated: Apr 19, 2016, 10:53 PM IST
१४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, महाविद्यालयाचे संस्थाचालक, शिक्षकांवर गुन्हा  title=

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील मुरुडमधील समुद्रात पुणे कॅम्प भागातील आबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी आज मंगळवारी महाविद्यालयाचे संस्थाचालक आणि सहल घेऊन गेलेल्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांकडून टाळाटाळ

या दुघर्टनाप्रकरणी शिक्षक आणि संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित विद्यार्थ्यांचे पालक अडीच महिन्यांपासून करीत होते. मात्र, पोलिसांकडून याप्रकणी टाळाटाळ होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.

उपोषणाचा इशारा

पालकांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या १३० विद्यार्थ्यांची सहल १ फेब्रुवारीला मुरुडला गेली होती. त्यापैकी १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण पुण्यातील राहणारे आहेत. 

घटनेच्यावेळी मच्छिमारांनी लगेचच समुद्रात उतरून बुडणाऱ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. पाण्यात बुडून १४ जणांचा मृत्यू झाला. ७ जणांना वाचविण्यात यश आले होते.