तळोजा एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग

 नवी मुंबईत तळोजा एमआयडीसीमधल्या निडीलॅक्स फाईन केम या केमिकल कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात, अग्निशमन दलाला यश आलंय. 

Updated: Nov 30, 2016, 11:54 PM IST
तळोजा एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग  title=

नवी मुंबई :  नवी मुंबईत तळोजा एमआयडीसीमधल्या निडीलॅक्स फाईन केम या केमिकल कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात, अग्निशमन दलाला यश आलंय. 

संध्याकाळी चारच्या सुमाराला ही आग लागली होती. कंपनीत केमिकलचं मिश्रण असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. 

दरम्यान बाजूलाच असलेल्या दीपक फर्टिलायझर कंपनीनं पाणी दिल्यानं, आग आटोक्यात ठेवणं अग्निशमन दलाला शक्य झालं. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही.