अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग

अंबरनाथच्या आनंदनगरच्या एमआयडीसीमधील डी.जी.केमिकलला भीषण आग लागलीय. संध्याकाळी ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत.

Updated: May 18, 2015, 09:13 PM IST
अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग title=
प्रातिनिधिक फोटो

अंबरनाथ: अंबरनाथच्या आनंदनगरच्या एमआयडीसीमधील डी.जी.केमिकलला भीषण आग लागलीय. संध्याकाळी ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत.

या आगीमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. संध्याकाळी कामगार बाहेर पडल्यानंतर कंपनीला अचानक आग लागली.  
डाय कलर बनवणारी ही केमिकल कंपनी आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

मात्र आग प्रचंड असल्यानं अद्याप ही आग विझविण्यात त्यांना यश आलेलं नाही. एमआयडीसी परिसरात अनेक केमिकल कंपन्या असल्यानं ही आग इतर ठिकाणी पसरू नये याची काळजी अग्निशमन दलाकडून घेण्यात येत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.