पालघरमध्ये रबर कंपनीला भीषण आग

पाली-विक्रमगड मार्गावरील टीना रबर इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला भीषण आग लागलीय. 

Updated: Jun 11, 2015, 02:05 PM IST
पालघरमध्ये रबर कंपनीला भीषण आग title=

पालघर : पाली-विक्रमगड मार्गावरील टीना रबर इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला भीषण आग लागलीय. 

या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाल्याचं वृत्त नाही. पण या आगीत कंपनीचं लाखो रुपयांचे नुकसान झालंय.

आज सकाळी ९ वाजता ही घटना घडली. विजेची ठिणगी पडल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. 

दरम्यान, या आगीची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचं काम सुरू आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.