तब्बल 25 वर्षांनंतर या गावात फडकला तिरंगा...

गडचिरोलीत एक विशेष घटना घडलीय. जिल्ह्यातील बीनागोंडा गावात तब्बल २५ वर्षांनी तिरंगा फडकलाय. 

Updated: Jan 29, 2015, 07:28 PM IST
तब्बल 25 वर्षांनंतर या गावात फडकला तिरंगा... title=

गडचिरोली : गडचिरोलीत एक विशेष घटना घडलीय. जिल्ह्यातील बीनागोंडा गावात तब्बल २५ वर्षांनी तिरंगा फडकलाय. 

विशेष म्हणजे, बीनागोंडा गाव हे नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे. घनदाट जंगलात वसलेले हे गाव म्हणजे 'नो मेन्स लॅण्ड'... नक्षलवाद्यांचा या गावात नेहमीच वावर असतो. त्यांची गावात दहशतही असते. 

गेल्या २५ वर्षांत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला नाही. मात्र पोलीस आणि नक्षलवादविरोधी पथकानं अत्यंत नियोजनपूर्वक ग्रामस्थांना विश्वासात घेत या भागात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाची तयारी केली. 

आश्रमशाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.