जळगाव जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

By Jaywant Patil | Last Updated: Monday, March 20, 2017 - 09:33
जळगाव जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

जळगाव : भादली गावातील एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली आहे. यात पती-पत्नी आणि  त्यांच्या २ मुलांचा समावेश आहे. हत्या झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. 

श्वानपथकाच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात येत आहे. मात्र एकाच कुटूंबातील चौघांची हत्या का करण्यात आली, यामागील कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. 

जळगाव जिल्ह्यातील भादली हे गाव सुबत्ता असलेलं गाव मानलं जातं. केळी आणि कापूस सारखी पिके घेण्यात गावकरी आघाडीवर असतात, या गावात अशी घटना झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

First Published: Monday, March 20, 2017 - 09:33
comments powered by Disqus