FTII विद्यार्थ्यांचं उपोषण मागे, मंगळवारी सरकारसोबत चर्चा

भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्था (एफटीआयआय)च्या विद्यार्थ्यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलंय. गजेंद्र चौहान यांना FTIIच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले होते. आता सरकारसोबत मंगळवारी ते चर्चा करणार आहेत.

Updated: Sep 28, 2015, 11:46 AM IST
FTII विद्यार्थ्यांचं उपोषण मागे, मंगळवारी सरकारसोबत चर्चा title=

पुणे: भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन संस्था (एफटीआयआय)च्या विद्यार्थ्यांनी आज आपलं उपोषण मागे घेतलंय. गजेंद्र चौहान यांना FTIIच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषणाला बसले होते. आता सरकारसोबत मंगळवारी ते चर्चा करणार आहेत.

विद्यार्थ्यांना माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून अधिकृतरित्या पत्र दिलं गेलंय. ज्यात विद्यार्थ्यांच्या मागणीवर विचार केला जाईल आणि मंगळवारी मंत्रालयासोबत चर्चा करण्याचं आश्वासन दिलंय.

आणखी वाचा - एफटीआयआय वाद : विद्यार्थ्यांची जामिनावर सुटका

विशेष म्हणजे FTIIच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिलं होतं. ज्यात सरकारनं चर्चेसाठी तयारी दर्शवली तर उपोषण मागे घेऊ, असं म्हटलं होतं. तब्बल १७ दिवसांनी आज विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतलंय. तीन विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले होते. 

मागील १०८ दिवसांपासून अभिनेता गजेंद्र चौहान यांना FTIIच्या अध्यक्षपदावरून हटविण्याच्या मागणीसाठी हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. 

आणखी वाचा -  FTIIचा वाद चिघळला, पोलिसांनी मध्यरात्री केली ५ विद्यार्थ्यांना अटक

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.