गडचिरोलीत सुरजागडच्या सुरक्षेसाठी अॅक्शन प्लान

 राज्य शासनाने सुरजागडच्या सुरक्षेसाठी अॅक्शन प्लॅन आखला असून त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 3, 2017, 02:06 PM IST

गडचिरोली :  नक्षलवाद्यांनी 24 डिसेंबर 2016 रोजी गडचिरोली एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज टेकड्यांवरील लोहखनिज वाहतूक करणा-या तब्बल 90 ट्रक्सना आग लावत राख केली होती. या घटनेनंतर जिल्ह्याच ड्रीम प्रोजेक्ट बारगळतो की काय अशी शंका व्यक्त केली जात होती. 

मात्र राज्य शासनाने सुरजागडच्या सुरक्षेसाठी अॅक्शन प्लॅन आखला असून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. यातील पहिले पाऊल म्हणजे येलचिल पोलीस ठाणे प्रत्यक्षात आले. अत्यंत दुर्गम जागी उभारल्या गेलेल्या या पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामकाजासाठी लागणारे साहित्य थेठ हेलिकॉप्टरने पोहचविण्यात आले. 

वीज पुरवठा, राहुट्या, तंबू आणि शस्त्रेही या पोलीस मदत केंद्राला पुरविण्यात आली आहेत. याच पोलीस ठाण्याच्या परिसरात एक हेलिपॅडदेखील उभारण्यात आलं आहे.