गजेंद्र चौहान येण्यापूर्वीच FTII मध्ये पुन्हा 'महाभारत'

एफटीआयआयचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान आज पुण्यातील 'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया' संस्थेत येऊन कार्यभार स्वीकारणार आहेत. परंतु, ते येण्याआधीच एफटीआयआयमध्ये पुन्हा एकदा महाभारत सुरू झालंय. 

Updated: Jan 7, 2016, 11:15 AM IST
गजेंद्र चौहान येण्यापूर्वीच FTII मध्ये पुन्हा 'महाभारत' title=

पुणे : एफटीआयआयचे नवनियुक्त अध्यक्ष गजेंद्र चौहान आज पुण्यातील 'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया' संस्थेत येऊन कार्यभार स्वीकारणार आहेत. परंतु, ते येण्याआधीच एफटीआयआयमध्ये पुन्हा एकदा महाभारत सुरू झालंय. 

संप मिटला असला तरी एफटीआयआय विद्यार्थ्यांचा गजेंद्र चौहान यांच्या निवडीला विरोध मात्र आजही कायम आहे. यामुळे, चौहान इथं येण्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं. यावेळी, पोलीस - विद्यार्थ्यांदरम्यान झटापटी झाली. त्यामुळे, वातावरण पुन्हा एकदा तापलं. 

चौहान पुण्यात दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काल रात्रीच १७ विद्यार्थ्यांना नोटीस बजावली होती. आज आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.  

दरम्यान, गजेंद्र चौहान यांच्या स्वागतासाठी  चकाचक केलं गेलं. नियुक्तीला सहा महिने झाल्यावर चौहान कार्यभार स्वीकारत आहेत. विद्यार्थ्यांनी चौहान यांच्या नियुक्तीला जोरदार विरोध केला होता. विद्यार्थ्यांचा संप आता संपला असला तरीही त्याच्या खुणा अजून कायम आहेत. त्यामुळे नव्या अध्यक्षांच्या स्वागतासाठी संस्थेत साफसफाई आणि रंगरंगोटी केली जात आहे.