पुण्यातल्या गणेशोत्सवाचं रूप पालटलं!

तब्बल सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज कमालीचा बदललाय. हा निश्चितच बदलत्या काळाचा परिणाम आहे, असं असलं तरी गणपतीच्या सणाला आलेलं निव्वळ इव्हेंटचं स्वरूप काहीसं निराशाजनकच म्हणावं लागेल. पुण्यातील गणेशोत्सवाचं स्वरुपही खूप बदललंय.  

Updated: Sep 3, 2014, 10:05 PM IST
पुण्यातल्या गणेशोत्सवाचं रूप पालटलं! title=

पुणे: तब्बल सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज कमालीचा बदललाय. हा निश्चितच बदलत्या काळाचा परिणाम आहे, असं असलं तरी गणपतीच्या सणाला आलेलं निव्वळ इव्हेंटचं स्वरूप काहीसं निराशाजनकच म्हणावं लागेल. पुण्यातील गणेशोत्सवाचं स्वरुपही खूप बदललंय.  

पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे भक्तांसाठी एक पर्वणी.. मात्र पूर्वीचा गणेशोत्सव आणि आताचा गणेशोत्सव यामध्ये फरक जाणवतो. घरगुती असो वा सार्वजनिक.. गणेशोत्सवाचं स्वरुप पालटलंय.. कधीकाळी पुण्यातील फडके हौद चौकात वज्रदेही मंडळापाशी पंडित भीमसेन जोशींची मैफल रंगायची... सदाशिव पेठेत बिस्मिल्लाखा साहेबांची सनई ऐकण्यासाठी मोठी गर्दी व्हायची… कुठे कथाकथन, कुठे एखाद्या ज्वलंत विषयावर व्याख्यान तर कुठे एखाद्या दिग्गजासोबत मुलाखतीचा कार्यक्रम…. आज त्याऐवजी फक्त येतात सेलिब्रिटी...

पुण्याला देखाव्यांची परंपरा होती.. राजकीय, सामाजिक आणि पौराणिक विषयांवरील देखावे प्रबोधन घडवतात.. मात्र आता त्याची जागा कर्णकर्कश डीजेंनी घेतलीय.. राजकीय नेते, स्पॉन्सर्सच्या होर्डींग्समध्ये बाप्पा हरवत चाललाय..

गणेशोत्सवाचं स्वरुप बदललं असलं तरी काही मंडळं ती पंरपरा जोपासण्याचा प्रयत्न करतायत.. साऱ्यांनी एकत्र येऊन गणेशोत्सवाची पुनर्मांडणी करण्याची गरज व्यक्त होतेय. 

बदललेलं राहणीमान आणि मंडळांचं अर्थकारण यामुळं गणेशोत्सवाचं रुप बदलतंय. टिळकांच्या कल्पनेतला गणेशोत्सव साजरा करत त्याला पूर्वीचं वैभव प्राप्त करुन देण्यासाठी साऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झालीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.