सामूहिक बलात्कार करून व्हिडीओ क्लिप काढली

जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात रस्त्यावरून जात असतांना एका 21 वर्षीय विवाहीतेचं अपहरण करण्यात आलं. या महिलेवर चार जणांनी बलात्कार केला.

Updated: Jul 1, 2014, 04:53 PM IST
सामूहिक बलात्कार करून व्हिडीओ क्लिप काढली title=

जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात रस्त्यावरून जात असतांना एका 21 वर्षीय विवाहीतेचं अपहरण करण्यात आलं. या महिलेवर चार जणांनी बलात्कार केला.

या चार जणांमध्ये पीडित महिलेच्या आतेभावाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी या महिलेची व्हिडीओ क्लिपही काढण्यात आली. 

बलात्कारानंतर तिला सोडून देण्यात आलं, तसेच तुला बोलावू तेव्हा परत ये, असं सांगण्यात आलं.

बलात्कारानंतर खचलेली ही महिला एका रिक्षात बसली रिक्षा चालकाला या महिलेची मानसिक स्थिती पाहून संशय आला. 

रिक्षा चालकाने या महिलेला महिला दक्षता समितीच्या दारातच सोडलं.

दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षा डॉ. अस्मिता पाटील यांना ही घटना सांगितली, अस्मिता पाचील यांच्यासह, सर्वांनी मिळून तिला धीर दिला.

या महिलेने तक्रार दाखल केला आहे, यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.