भिवंडीत नवविवाहितेवर पतीसमोर गँगरेप

Last Updated: Monday, August 18, 2014 - 20:08
भिवंडीत नवविवाहितेवर पतीसमोर गँगरेप

भिवंडीः आपल्या कुटुंबासह आठ दिवसांपूर्वीच भिवंडीत वास्तव्यास आलेल्या नवविवाहितेवर तिच्या पतीसमोर गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १९ वर्षांच्या नवविवाहितेवर तिच्या घरात घुसून रविवारी मध्यरात्री या नराधमांनी गँगरेप केला.

पीडितेच्या घराच्या छताचे पत्रे काढून तिघे जण घरात घुसले आणि नवऱ्याला मारहाण करून त्याच्यासमोरच पत्नीवर बलात्कार केला. महिलेच्या पतीने आरडाओरड केली पण या नराधामांनी शेजार्यां च्या घराला बाहेरून कड्या लावल्यानं मदत मिळू शकली नाही. 

एवढचं नाहीतर या दाम्पत्याची सोन्याची चेन आणि मंगळसूत्र सुद्धा नराधमांनी पळवलं आहे. दरम्यान काल रात्री पोलीस ठाण्यात बलात्कार आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात असून ३ संशयितांना निजामपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

भिवंडीत गेल्या १५ दिवसांत चोरीच्या सुमारे १६ घटना घडल्या आहेत आणि या बलात्कारानं भिवडीतल्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Monday, August 18, 2014 - 20:03
comments powered by Disqus