दहावीच्या पेपरआधीच रेल्वेतून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

बदलापूरवरुन वांगणीला जात असताना लोकलमधून पडून प्रिती चव्हाण या दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Updated: Mar 1, 2016, 11:37 PM IST
दहावीच्या पेपरआधीच रेल्वेतून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू title=

बदलापूर : बदलापूरवरुन वांगणीला जात असताना लोकलमधून पडून प्रिती चव्हाण या दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

सोमवारी दुपारी कर्जत लोकलनं प्रिती दहावीच्या क्लाससाठी जात होती. त्यावेळी बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्टेशन दरम्यान लोकलमधून पडून प्रिती गंभीर जखमी झाली.

जखमी अवस्थेत तिला कल्याणच्या मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय.. 

मंगळवारपासून दहावीची परीक्षा सुरु झालीय आणि त्याआधीच प्रितीचा अशा रितीने मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येतेय.