दोन तरुणींना चोरीचा आळ घेऊन पोलिसांनी डांबले

Last Updated: Saturday, July 12, 2014 - 17:34
दोन  तरुणींना चोरीचा आळ घेऊन पोलिसांनी डांबले

ठाणे : रेल्वेतून प्रवास करणा-या महिला प्रवाशांची सुरक्षा आधीच रामभरोसे असताना रेल्वे पोलिसांकडूनच महिला प्रवाशांच्या आयुष्याशी खेळ खेळला जातोय. आता, आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. डोंबिवली रेल्वे पोलिसांनी असाच एक प्रताप करुन दाखवला आहे. आपल्या मित्राच्या वाढदिवसासाठी उल्हासनगरला निघालेल्या दोन महाविद्यालयीन तरुणींना चोरीचा आळ घेऊन तुरुंगात डांबून ठेवल्या़ची तक्रार दोन तरुणींनी केली आहे.

एम कॉमचं शिक्षण घेत असलेल्या या तरुणींवर पाकिटमारी, मोबाईल चोरी आणि मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल करण्या़त आलेत. एवढंच नाही तर त्यांना संपूर्ण रात्र तुरुंगात डांबून अमानुष मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप त्या दोन तरुणींनी केलाय.

डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनमधील कर्मचारी त्यांच्याचसमोर त्यांच्याविषयी अश्लील बोलत होते. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतरही वरिष्ठांकडून अद्याप या प्रकाराची दखल घेण्यात आलेली नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.First Published: Saturday, July 12, 2014 - 17:33


comments powered by Disqus