शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, दूध काढण्याचे नवे तंत्र

जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनीच्या मेकँनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'सायकल ऑपरेटेड मिल्किंग मशिनला राज्यस्तरावरील' द्वितीय मानांकन मिळाले आहे. कमी खर्चात तयार होणारे हे इको फ्रेन्डली मशीन शेतकऱ्यांना फायद्याचं ठरणार आहे.

Updated: Apr 9, 2015, 11:39 AM IST
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, दूध काढण्याचे नवे तंत्र title=

अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनीच्या मेकँनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'सायकल ऑपरेटेड मिल्किंग मशिनला राज्यस्तरावरील' द्वितीय मानांकन मिळाले आहे. कमी खर्चात तयार होणारे हे इको फ्रेन्डली मशीन शेतकऱ्यांना फायद्याचं ठरणार आहे.

दुग्धव्यवसाय हा महाराष्ट्रातील शेतीपूरक व्यवसाय. मजुरांचा तुटवडा हा या व्यवसायाचा नेहमीचा प्रश्न. मात्र सध्या यांत्रीकिकरणामुळे हा व्यवसाय तेजीत आहे. मात्र लहान शेतक-यांना दूध काढण्याची यंत्रे परवडत नाहीत. मात्र अमृतवाहीनी अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या मेकँनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी यावर उपाय शोधलाय.

अतिशय अल्प दरात उपलब्ध होईल असे सायकल ऑपरेटेड मिल्कींग मशिन या विद्यार्थ्यांनी बनवलंय. सायकलचे पँडल, दोन फूट पंप, व्हक्युम व्हाल्व ही या उपकरणाची मुख्य साधनं. केवळ सहा ते सात हजारात बनलेल्या या उपकरणाला राज्य स्तरीय स्पर्धेतील द्वितीय मानांकन मिळाले आहे. सायकल चालवल्या सारख पँडेल मारून या मशिनद्वारे दूध काढता येते. 

विशेष म्हणजे या मशिनसाठी विजेची गरज भासत नाही. शिवाय या मशीनचा आवाजही येत नाही.. वजनानं हलकं असल्यामुळे हे पोर्टेबल मशीन कुठेही सहज नेता येतं. त्यामुळे हे नवं मिल्कींक मशीन आता शेतक-यांना फायद्याचं ठरणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.