दिल्ली, मुंबई विमानतळावर नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्ष विक्री

लवकरच दिल्ली आणि मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागपूरची संत्री आणि नाशिकची द्राक्ष विक्री सुरू होईल असं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटंल आहे. मराठवाड्यात येत्या काळात 60 हजार कोटींच्या रस्त्यांची काम सुरु होतील अस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. या रस्त्यांना मंजूरी देणं सुरु आहे.

Updated: Mar 26, 2017, 09:41 AM IST
दिल्ली, मुंबई विमानतळावर नागपूरची संत्री, नाशिकची द्राक्ष विक्री  title=

औरंगाबाद : लवकरच दिल्ली आणि मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागपूरची संत्री आणि नाशिकची द्राक्ष विक्री सुरू होईल असं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटंल आहे. मराठवाड्यात येत्या काळात 60 हजार कोटींच्या रस्त्यांची काम सुरु होतील अस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. या रस्त्यांना मंजूरी देणं सुरु आहे.

मार्च महिना संपल्यानंतर सर्वच रस्त्यांना मंजूरी मिळेल आणि पुढील दोन महिन्यात रस्त्यांची कामही सुरु होतील असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. मराठवाड्याबाबत केंद्राकडून जे काही आश्वासनं देण्यात आलेली ती पूर्ण करण्यात येतील असंही गडकरी म्हणाले. हेडगेवार रुग्णालयाच्या  एका उद्घाटन कार्यक्रमात ते आले होते त्यावेळी बोलतांना त्यांनी हेडगेवार रुग्णालयासारखे सेवाभावि काम करण्याची समाजात गरज आहे असेही सांगितले.