राज्यातलं पाणी गुजरातला वळवण्याची तयारी

महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना जे जमलं नाही, ते गुजरातचे राज्यकर्ते करून दाखवणार आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यांतील डोंगर रांगातलं तब्बल ८३ टीएमसी पाणी गुजरातला जाण्याची शक्यता आहे. 

Updated: Jan 12, 2015, 11:49 PM IST
राज्यातलं पाणी गुजरातला वळवण्याची तयारी  title=

 नाशिक : महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना जे जमलं नाही, ते गुजरातचे राज्यकर्ते करून दाखवणार आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यांतील डोंगर रांगातलं तब्बल ८३ टीएमसी पाणी गुजरातला जाण्याची शक्यता आहे. 

जे पाणी  डोंगराच्या पश्चिम दिशेतून पूर्व दिशेकडे नेण्याचं महाराष्ट्राला २०-२५ वर्षात जमलेलं नाही, तेच पाणी समुद्र मार्गे थेट कच्छ, भूजपर्यंत नेण्याची योजना नरेंद्र मोदींच्या गुजरातनं आखली आहे.

यामुळे खानदेशच्या १८ तालुक्यांनाही भविष्यात मोठा फटका बसणार आहे, नार-पार-दमणगंगा योजना राबवली, तर पश्चिम वाहिनीचे पाणी पूर्वेला गिरणा नदीत टाकता आलं असतं, यामुळे खानदेशातील १८ तालुके सुजलाम सुफलाम झाले असते, असं नार-पार-दमणगंगा लिंक प्रकल्पासाठी जनजागृती करणारे जळगावचे अॅड. विश्वासराव भोसले यांनी म्हटलं आहे.
 
महाराष्ट्राची या पाण्याच्या नियोजनाच्या बाबतीत अनास्था दिसून येत आहे.  हे पाणी वर्षानुवर्ष समुद्राला जाऊन मिळतं,  त्यामुळं साहजिकचं हे पाणी गुजरातला नेण्याची परवानगी केंद्राकडूनही दिली जाण्याची शक्यता वाढली आहे. 
 
१९८२ पासून पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेला वळवण्याच्या मागणीनं जोर धरत होती, मात्र आंदोलनं, कोर्ट कचेऱ्या झाल्यानं यातले बहुतांश प्रकल्प केवळ कागदावरच राहिले. शिवाय जन आंदोलनाची धार कमी पडल्यानं आजची परिस्थिती ओढावल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.