तुमचा पुढचा मुक्काम पाहा मग बोला!

भविष्यात आपला मुक्काम कुठे राहणार याचा अजित पवारांनी आधी करावा आणि मगच बोलावं असा टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे.

Updated: Dec 13, 2016, 08:29 PM IST
तुमचा पुढचा मुक्काम पाहा मग बोला! title=

इंदापूर : भविष्यात आपला मुक्काम कुठे राहणार याचा अजित पवारांनी आधी करावा आणि मगच बोलावं असा टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे. शेवटी सगळं इकडेच फेडायचं आहे. सगळ क्लिअर करून मग वर जायचं आहे, असंही हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.

भ्रष्टाचाराची आठवण करुन देत अजित पवारांना बारामतीच्या जेलमध्ये जावं लागेल अशी टीका हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. इंदापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.