गुड्डूच्या विरहात दीप्ती व्याकूळ

हिंस्र पाण्यांना भावभावना नसतात असं तुम्ही समजत असाल तर ते खोटं आहे. औरंगाबाद प्राणी संग्रहालयातल्या गुड्डू वाघाचा मृत्यू झाल्यानंतर, त्याची जोडीदार दिप्ती विरहात व्याकूळ झाली आहे. 

Updated: Jan 22, 2016, 04:05 PM IST
गुड्डूच्या विरहात दीप्ती व्याकूळ title=

औरंगाबाद : हिंस्र पाण्यांना भावभावना नसतात असं तुम्ही समजत असाल तर ते खोटं आहे. औरंगाबाद प्राणी संग्रहालयातल्या गुड्डू वाघाचा मृत्यू झाल्यानंतर, त्याची जोडीदार दीप्ती विरहात व्याकूळ झाली आहे. 

सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातली ही दीप्ती वाघीण सध्या शून्यात हरवली आहे. तिची नजर शोध घेतेय तिच्या शेजारच्या रिकाम्या पिंज-यातला तिचा साथीदार गुड्डू वाघाचा. 19 वर्षांचा गुड्डू 19 जानेवारीला हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू पावला. 

गेल्या 16 वर्षांची दीप्ती आणि गुड्डूची साथ गुड्डूच्या जाण्यानं भंगली आणि दीप्ती उदास झालीय. ती आता पिंज-याबाहेर पडत नाही, की काही खात नाही. फक्त नजर तिरपी करुन ती गुड्डूच्या रिकाम्या पिंज-याकडे एकटक बघत बसते. विरहाचं दुःख दिप्तीच्या डोळ्यांतूनच व्यक्त होतंय.

फक्त दीप्तीच नाही, तर दीप्ती - गूड्डूपासून जन्मलेले बछडे आणि त्यांची नातवंडं असे एकंदर सातही पट्टेदार वाघ, गुड्डूच्या जाण्यानं सुन्न झालेत. गुड्डू मृत्यू पावला त्या दिवशी एकाही वाघानं अन्नाला तोंड लावलं नाही. आता इतर वाघ सावरलेत. आयुष्यभराची साथसंगत केलेली दीप्ती मात्र, गुड्डूच्या विरहाची वेदना सोसत आहे.