यवतमाळ येथे मुसळधार पावसाने हरभरा, गव्हाचे नुकसान

जिल्ह्यातील वणी आणि मारेगाव परिसराला मुसळधार पावसानं झोडपले. वादळ वा-यासह आलेला हा पाऊस तासभर जोरदार बरसला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 7, 2017, 07:14 PM IST
यवतमाळ येथे मुसळधार पावसाने हरभरा, गव्हाचे नुकसान title=
संग्रहित छाया

यवतमाळ : जिल्ह्यातील वणी आणि मारेगाव परिसराला मुसळधार पावसानं झोडपले. वादळ वा-यासह आलेला हा पाऊस तासभर जोरदार बरसला.

सोसाट्याचा वारा त्यात दमदार पाऊस यामुळे शहरी भागात नागरिकांची त्रेधातिरपट उडाली. तर ग्रामीण भागात शेतक-यांना पावसानं फटका दिला. शेतातील हरभरा आणि गहू या पिकांची पावसामुळे हानी झाली. उभा गहू आडवा झाला तर शेतातील तुरीचे ढीगही पावसानं भिजले. 

तूर खरेदी बंद असल्यानं शेत शिवरासह, शेतक-यांच्या घरी आणि बाजार समितीच्या यार्डात तूर साठवून ठेवण्यात आलीय. पावसामुळे या तुरीला नुकसान पोहोचलं. वादळामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली तर काही काळ वीज पुरवठा देखील खंडीत झाला.