पालघर जिल्ह्यात खड्ड्याचं गूढ

पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यात पाचलकरपाडा इथं अचानक तयार झालेल्या खड्ड्याचं गूढ कायम आहे. हा खड्डा आहे की जुनी विहीर याबाबत प्रशासनच संभ्रमात असल्याचं आता समोर येतंय.

Updated: Jun 23, 2015, 09:01 PM IST
पालघर जिल्ह्यात खड्ड्याचं गूढ title=

विक्रमगड : पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुक्यात पाचलकरपाडा इथं अचानक तयार झालेल्या खड्ड्याचं गूढ कायम आहे. हा खड्डा आहे की जुनी विहीर याबाबत प्रशासनच संभ्रमात असल्याचं आता समोर येतंय.

काही दिवसांअगोदर तुलसी कोथे या महिलेच्या शेतात जवळपास २२ फुटाचा खड्डा निर्माण झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिसरात अनेक वर्षांआधी विहीर अस्तित्वात होती. मात्र नंतर हीच विहीर मातीनं बुजवण्यात आली.

अनेक वर्षांपासून पावसामुळं पाणी पडून या जमिनीवरील माती खाली सरकल्याने हा खड्डा तयार झाल्याचं कालपर्यंत तहसीलदार सांगत होते. मात्र आता यासंदर्भात भूगर्भशास्त्रज्ञांची मदत घेणार असल्याचं प्रशासन म्हणतंय. त्यामुळं या खड्ड्याचं गूढ आणखी वाढलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.