विजेचा शॉक देऊन जंगली रानडुक्करांची शिकार, तिघांना अटक

जिल्ह्यात हेटी गावच्या जंगलात विजेचा शॉक देऊन जंगली रानडुक्करांची शिकार करणा-या तिघांना अटक करण्यात आली.

Updated: Jan 11, 2017, 11:25 PM IST
विजेचा शॉक देऊन जंगली रानडुक्करांची शिकार, तिघांना अटक

गोंदिया : जिल्ह्यात हेटी गावच्या जंगलात विजेचा शॉक देऊन जंगली रानडुक्करांची शिकार करणा-या तिघांना अटक करण्यात आली.

हाय टेन्शन विद्युत प्रवाहाच्या तारांवरून लोखंडी ताराच्या सहाय्याने विजेचा कंरट लावून ठेवला असता त्यात अडकून जंगली रानडुकरांचा मृत्यू झाला. दुस-या दिवशी मृत डुकराला आणण्यासाठी हा आरोपी गेला असता जंगलातल्या छुप्या कॅमे-यात तो कैद झाला.

या फुटेजच्या मदतीने या आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे तिघांना अटक करण्यात आली असून शिकारीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.