मी 'अफझल खान' असा नामोल्लेख केला नाही - विनायक राऊत

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा अफझल खान असा नामोल्लेख आपण कुठेही केलेला नाही. अमित शहा यांच्याबद्दल आपल्याला अत्यंत आदर आहे. ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे आपल्या संस्कृतीत नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे.

Updated: Jun 24, 2015, 08:16 PM IST
मी 'अफझल खान' असा नामोल्लेख केला नाही - विनायक राऊत  title=

सिंधुदुर्ग : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा अफझल खान असा नामोल्लेख आपण कुठेही केलेला नाही. अमित शहा यांच्याबद्दल आपल्याला अत्यंत आदर आहे. ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे आपल्या संस्कृतीत नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना अफझलखानची उपमा देणाऱ्या व्यक्तीने व्यासपीठावर येऊन बोलावे, असे कुडाळ येथील भाजपच्या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी असे खुले आव्हान दिले होते, खासदार राऊत यांचे नाव न घेता हे आव्हान देण्यात आल्याची चर्चा होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.