पैशाचा पाऊस पाडण्यासाठी मुलगीवरच लावली बोली

पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून मुलगी विकत घेण्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडलाय. मुलीला विकत घेण्यासाठी त्याने चक्क बोली लावली. 

Updated: May 27, 2016, 08:46 AM IST
पैशाचा पाऊस पाडण्यासाठी मुलगीवरच लावली बोली title=
संग्रहित

पुणे : पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवून मुलगी विकत घेण्याचा धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडलाय. अंधश्रद्धेतून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी भोंदूबाबाला सहा फूट उंची असणारी अविवाहित मुलगी हवी होती. अशा मुलीचा शोध त्यांनी घेतला. बारामती तालुक्यातील तरडोली इथल्या नववीत शिकणारी मुलगी त्यांना आढळली. या मुलीला विकत घेण्यासाठी त्याने चक्क बोली लावली. 

या भोंदूबाबानं त्या मुलीच्या वडिलांकडे मुलगी विकत देण्याची मागणी केली. त्या बदल्यात आठ लाख आणि दहा तोळं सोनं देण्याचं आमिष मुलीच्या वडिलांना दाखवण्यात आलं. या सगळ्या धक्कादायक प्रकारानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली.

तमात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुनही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हा प्रकार समजताच त्यांनी पीडित मुलगी आणि तिच्या वडिलांची भेट घेतली.

अखेर अंनिसच्या दबावानंतर पोलिसांनी याप्रकरणी अंधश्रद्धा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.