नाशकात पैशाचा पाऊस, लोकांच्या श्रद्धेच्या गैरफायदा घेत गोरखधंदा

लोकांच्या श्रद्धेच्या गैरफायदा घेऊन त्यांचा फसवण्याचा हा गोरखधंदा दिवसढवळ्या सुरू आहे. मुंबई  आगरा महामार्गावर चांदवड हे गाव ओळखलं जातं रेणुका देवीच्या तीर्थक्षेत्रामुळे. राज्यात सर्वत्र ख्याती असलेलं हे गाव अशा पैशाच्या पावसामुळे चांगलंच चर्चेत आलंय. 

Updated: Mar 26, 2015, 03:58 PM IST
नाशकात पैशाचा पाऊस, लोकांच्या श्रद्धेच्या गैरफायदा घेत गोरखधंदा  title=

नाशिक : लोकांच्या श्रद्धेच्या गैरफायदा घेऊन त्यांचा फसवण्याचा हा गोरखधंदा दिवसढवळ्या सुरू आहे. मुंबई  आगरा महामार्गावर चांदवड हे गाव ओळखलं जातं रेणुका देवीच्या तीर्थक्षेत्रामुळे. राज्यात सर्वत्र ख्याती असलेलं हे गाव अशा पैशाच्या पावसामुळे चांगलंच चर्चेत आलंय. 

पंचवीस हजारांचे पन्नास हजार, एक लाखांचे दोन लाख, अशा भूलथापा लोकांना देऊन भ्रमित करण्याचा गोरखधंदा इथे केला जातो. विशेष म्ङणजे कोणत्याही द-याखो-यात नाही तर थेट तहसीलदार कार्यालयाच्या समोर एका घरात हा धंदा बिनबोभाट सुरू आहे. पुजाअर्चेचं नाटक करत पोलिसांचा धाक दाखवल्याने कोणीही पोलिसांत तक्रार करण्यास धजावत नाही. सुरूवातीला छोट्या रकमा दुप्पट करून द्यायच्या नंतर मोठमोठ्या रक्कमांना लोकांना लुबाडायचे धंदे सुरू आहेत

वडाळी गावातला पगारे नावाची व्यक्ती या प्रकरणाचा सूत्रधार आहे. याच परिसरात त्याचे साथीदार आहेत. दररोज रात्री चांदवड वडाळी भागात महागडी वाहानं येतात. त्यामुळे तहसीलदार रस्ता जाम असतो. असं असताना काहीही ठावूक नसल्याचा आव आणणारे पोलीस स्थानिकांच्या वक्तव्याने उघडे पडलेत. 

तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच पोलिसांची कस्टडी आहे. इथे शस्त्रे आणि इतर सामान असल्यामुळे पोलिसांचा वावर नेहमीच असतो.. मात्र असं असूनही पोलिसांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय. प्रत्येक जिल्ह्यात या उद्योगात गुंतलेल्यांचे प्रतिनिधी आहेत. पोलिसांसह सर्वांनाच कमिशन मिळत आहे. औरंगाबादमध्ये पोलिसांचा सहभाग उघड झाला. नाशिक जिल्ह्यातही ग्रामीण पोलिसांच्या आशीर्वादाने हे सर्व घडत असल्याची कुजबूज आहे. गेल्या चार वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र पोलिसांचा गुप्तचर विभाग करतो काय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उभी राहिली आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.