नाशिकात मुलीची छेड, वाचविणाऱ्यावरच चाकू हल्ला

अॅथलेटिक्स कोचवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मुलींची छेड काढणा-या गुंडांना प्रतिकार केल्यानं चाकूनं वार करण्यात आलेत. जखमी कोचवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 5, 2017, 04:36 PM IST
नाशिकात मुलीची छेड, वाचविणाऱ्यावरच चाकू हल्ला title=

नाशिक : अॅथलेटिक्स कोचवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मुलींची छेड काढणा-या गुंडांना प्रतिकार केल्यानं चाकूनं वार करण्यात आलेत. जखमी कोचवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एका अॅथलेटिक्स कोचवर गुंडांनी चाकूने हल्ला केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. नाशिकच्या आसाराम पूलाजवळ ही घटना घडलीय. अॅथलेटिक्स कोच वैजनाथ काळे मुलींना प्रशिक्षण देत होते. त्यावेळी काही गुंडांनी मुलींची छेड काढली. 

या छेड काढणा-या गुंडांना कोच वैजनाथ काळे यांनी प्रतिकार केला. याच रागातून या गुंडांनी वैजनाथ काळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. जखमी वैजनाथ काळे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.